मनाचे झालेले तुकडे!
World Schizophrenia day 24th May 2021. वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे च्या निमित्तानं. स्किझोफ्रेनिया म्हणजेच छिन्नमनस्कता...मनाचे झालेले तुकडे! "मॅडम माझ्या मुलाला जेवण बिलकुल आवडत नाही, सारखा येता जाता मी जेवणात काही टाकत आहे का असं बघत राहतो, विचारतो." "माझी बहिण ३ महिने झाले कामावर जात नाहीय सारखी म्हणते की माझ्या कामावर लोकं जळत आहेत, माझे इमेल्स वाचतात आणि त्याचा दुरुपयोग करत आहेत." "माझी बायको खूप तापट आहे, संशयी आहे. तिला मी कुणाशीही बोलले आवडत नाही, एक सारखी मला विचारत असते की माझ्याविषयी बोलत आहात का?" "लोक माझ्या वाईटावर आहेत, मी चांगले काम केलं तरीही लोक माझ्याबद्दल वाईट च बोलत आहेत, मी ऑफिस मध्ये गेलो की लोक माझ्याकडे बघून कुजबुजत असतात." असं काही कानावर पडलं तर तुम्ही काय करता? हे सारं कदाचित ऐकायला 'नॉर्मल' वाटत असलं तरीही असेलच असं नाही. कधीतरी येणारा संशय हा काही स्वरूपात आपण सर्व जण अनुभवतो पण 'एक सारखा' येणारा संशय आणि त्यानुसार जर तसं 'वर्तन' केलं जात असेल तर वेळीच मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे. या मानसिक ...