Posts

Showing posts from 2020

कधी शिकणार ?

Image
अपंगत्व आणि आपण ३ डिसेंबर - इंटरनॅशनल डे ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी वरची पोस्ट इन्स्टा आणि एफबी वर टाकली, वाटलं चला काम झालं, पण मनात खूप सगळे प्रश्न अजूनही होते आणि दुर्र्दैवांन राहतील. असं असू शकतं का कि ज्या cause साठी आपण काम करायचंय असं म्हणून हट्टाने काम करतोय पण ते खरच साध्य होतंय का? खऱ्या अर्थाने लोकं सजग होत आहेत का? आज मी अपंगत्व आणि सर्वसमावेशकता यावर लिहिलंय पण माझ्या अनुभवाप्रमाणे ज्या मोठमोठ्या शाळा "आम्ही सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह आहोत" अशा खरंच वेगळी, स्पेशल गरज असलेल्या मुलांना घेतात ? नाही!   आता स्पेशल म्हणजे काय ? कि ज्या मुलांना शारीरिक अपंगत्व आहे. अगदी कुठल्याही शाळेत त्यांना ऍडमिशन मिळू शकतं हे त्या खुद्द पालकांना हि माहित नसतं, शाळेत अशा मुलांसाठी काय गरज आहे, काय असायला हवंय? असं म्हणून फक्त काउन्सेलर आणि एकटा प्रिन्सिपल सेन्सिटिव्ह असून चालत नाही, संपूर्ण मॅनेजमेंट टीम यासाठी संवेदनशील व प्रसंगी कृतिशील लागते. पण त्यांना याच काहीच पडलेलं नसतं आणि यासाठी काही अज्ञानी आणि घाणेरडया मनोवृत्ती जवाबदार असतात त्या म्हणजे, - शेवट...

१८००चा हिशोब , जगण्याची धडपड, अनभिज्ञता आणि आपण !

Image
पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि शंभर- दोनशेची प्रत्येकी एक नोट असे एकूण १  हजार ८०० रुपये एका घरकाम करणाऱ्या काकूंना तेथील तरुणांनी दिले याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. १८०० चा हिशोब मागणाऱ्या या काकू बघितल्या आणि अगदी पहिली प्रतिक्रिया ही होती की, यात खरंच एवढं हसण्यासारखं काय आहे? एक बाई आपल्या मेहनतीचे पैसे मागत आहे जसे आपणही न कळल्यास मागत असतो, मागतो, फील करतो, करू शकतो आणि समजवणारे तिला समजवत आहेत. मात्र ते तरुण हा सर्व संवादाचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून हसणारे लोक ही अनेक दिसले आणि दया आली की, आज खरंच इंटरनेट नसते तर काय झालं असतं ? आपण करमणूकच कशी केली असती ? मग ती दुसऱ्याची फजिती बघून का होईना! हो ना? असो.  मग तोही विषय जुना झाला आणि मग लोकं झोपेतून जागे झाल्यासारखं म्हणायला लागले की, अरे हे तर ट्रोलिंग आहे. हे थांबवले पाहिजे. इतपत ठीक आहे, पण त्यावर सुद्धा तुमच्या आमच्यासारखे सुजाण, सुखी किंवा विशेषाधिकार असणारे वगैरे असे, म्हणायला लागले की काहीही (भली मोठी, टेक्निकल ) नावं का देत आहात ?, ट्रोलिंग कुठेय ते ? कित्ती इनोसन्...